यांच्या बापाचा बाप आला, तरी….!! सुदर्शन घुलेच्या अटकेनंतर मनोज जरांगे यांचे मोठं वक्तव्य


बीड  : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे.

यानंतर ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातल्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. असे असताना मृत देशमुख यांना न्याय देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत आज मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकरण थंड करुन दाबण्याचा प्रयत्न होतोय का? यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही मॅटर दाबू देणार नाही, गृहमंत्रालयाला एकच सांगणं आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सुद्धा सोडू नका.

ते सुद्धा खुनाला जबाबदार आहेत. ज्यांची वाहन वापरली, ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. गुन्हेगारांना लपवून ठेवणं ही भूमिका चांगली नाही. यांना धडा शिकवणं गरजेच आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे.

पण कृष्णा आंधळे अजून फरार आहे. दरम्यान या दोन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या आणि टीप देणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.चसंतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे.

त्याचवेळी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे यांना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना पळवून लावण्यात संभाजी वायबसेची महत्वाची भूमिका होती. डॉ संभाजी वायबसे यानेच पळून जाण्यात मदत केल्याच समोर आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!