अजित पवारांच्या जवळचा कार्यकर्ता असला तरी त्याचा बंदोबस्त करा!! अजितदादांनी बारामतील ‘त्या’ प्रकरणावर थेट आदेशच दिले…

बारामती : बारामतीत काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या एका टी सेंटरमध्ये काम करत असलेल्या मुलाला अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघंजणांनी बेदम मारहाण केली, तसेच त्याला पुन्हा रस्त्यावर ओढत नेऊन तिथे देखील मारहाण केली. यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
आरोपींना याबाबत अटक केली असून याचा व्हिडिओ सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावर अजित पवार म्हणाले, एखाद्या कुत्र्याला मारलं, तरी आपण म्हणतो कशाला मुक्या प्राण्याला मारतोय? मरुस्तोर मारलं. त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळतात तसे लाथा मारत होते.
मी पोलिसांना सांगितलं, अजित पवारांच्या जवळचा कार्यकर्ता असला तरी आणि त्याच्या मुलांनी जरी असं केलं तरी त्याचा बंदोबस्त करा. मी असलं अजिबात खपवून घेणार नाही. त्यांच्यावर केसेस करा, असेच गुन्हे करत राहिले तर त्यांच्यावर मकोका लावा. मेहरबानी करा, पण कुणी कायदा हातात घेऊ नका. असा इशाराच त्यांनी दिला आहे.
तसेच ते म्हणाले, कुणी तुमचं काय चुकीचं केलं तर पोलिसांकडे येऊन तक्रार करा. काहीजण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यागत ठोकून काढतात, बदडून काढतात. हे होता कामा नये. तुमची मुलं काय करतात, मुली काय करतात? ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती पालकांनी पार पाडावी.
मला मुंबईत फोन येतात दादा.! पोटात घ्या. पोटात घ्या..अरं पार पोट फुटायला लागलं आणि काय पोटात घ्या? काही सांगतात सांगणाऱ्या ला पण लाज लज्जा शरम वाटत नाही. असे म्हणत अजित पवार संतापले.