48 तासात 27 कोटी भरा, नाहीतर…!! खासदार सुप्रिया सुळेंचा थेट अल्टिमेटम, पुण्यात घडतंय काय?

पुणे : दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी राज्यात वातावरण तापले आहे. याबाबत अनेकांनी आंदोलने करून कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत.
अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महानगरपालिकेत बैठक घेतली. सुळे यांनी बैठकीत मंगेशकर रुग्णालय प्रकरणात चर्चा केली. यावेळी त्यांनी महानगरपालिकेला इशारा दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या टॅक्स संदर्भात महापालिकेला इशारा दिला आहे. ४८ तासात मंगेशकर हॉस्पिटलचा टॅक्स पालिकेने भरून घेतला नाही, तर आंदोलन करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडे महापालिकेची २७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या प्रकरणावर बोलताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकरण न्यायालयात असल्याने वसुली थांबवली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात राज्य सरकारचा अहवाल सादर होणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉ राधाकिशन पवार आपला अहवाल पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करतील.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उद्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेणार आहे. या बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातला अहवाल सादर केला जाईल