Electricity : मोठी बातमी! राज्यात होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती, महावितरणचा दावा..


Electricity :  एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच ३५०० मेगावॅट वीजनिर्मिती होईल, असा महावितरणाने दावा केला आहे. राज्यात २४ एप्रिलला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सुरू करण्यात आली आहे. Electricity

या योजनेसाठी अल्पावधीत सार्वजनिक जमीन उपलब्ध करण्यात आली आहे. त्यातून सुमारे ३५०० मेगावॅट वीजनिर्मिती लवकरच सुरू होणार आहे, असा दावा महावितरणने केला आहे. Electricity

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा अभ्यास करण्यासाठी नुकतीच कर्नाटकच्या ऊर्जा सचिवांसह वीज कंपन्यांच्या प्रमुखांनी महावितरणच्या मुंबई, नागपूर व पुणे येथील कार्यालयाला भेट दिली.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिवसा व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी कर्नाटकच्या शिष्टमंडळास मार्गदर्शन केले.

उपमुख्यमंत्र्यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील किमान ३० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्याचे मिशन २०२५ निश्चित केले असून ते गाठण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!