कसबा पेठ, चिंचवडमध्ये निवडणूकीची तयारी पूर्ण, निकालाकडे राज्याचे लागले लक्ष…!

पुणे : पुण्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात एकूण आठ लाख 44 हजार 623 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह अनेक मंत्री देखील रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात रविवारी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. चिंचवड मतदारसंघामध्ये 5 लाख 68 हजार 954 इतकी मतदारांची संख्या असून, त्यात 3 लाख 2 हजार 946 पुरुष, 2 लाख 65 हजार 974 स्त्री, तर 34 तृतीयपंथी मतदार आहेत.
तसेच कसबा पेठ मतदारसंघामध्ये 2 लाख 75 हजार 679 इतकी एकूण मतदारांची संख्या असून, त्यापैकी 1 लाख 36 हजार 984 पुरुष, 1 लाख 38 हजार 690 स्त्री व 5 तृतीयपंथी मतदार आहेत. सध्या याठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे.