Eknath Shinde Resigned : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, राजभवनात राजकीय घडामोडींना वेग, नवीन मुख्यमंत्रीही ठरला?


Eknath Shinde Resigned : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

त्यातच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनावर पोहोचले आहेत.

विधानसभेचा कार्यकाळ संपत असून प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनात उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला.

तसेच राज्यात नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा दिला. सोबत दोन्ही मावळते उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे आभार मानले. राज्यपालांनी शिंदे सरकारच्या कार्यकाळाचे कौतुक केले. Eknath Shinde Resigned

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना १२ जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!