Eknath Shinde : भाजपची ऑफर शिवसेनेला अमान्य? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमकं घडतंय काय?

Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर तिढा सुरू झाला आहे.
भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या हातीच पुन्हा कारभार देण्याची मागणी केली आहे. आता ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, भाजपने दिलेल्या ऑफरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपने शिंदे यांना २ ऑफर दिल्या आहेत. यात थेट मोदींच्या टीममध्ये सामील होण्याची ऑफर आहे. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे, अशी पहिली ऑफर आहे. Eknath Shinde
जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील होण्याची संधी आहे. तर एकनाथ शिंदे यांना भाजपकडून राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ॲाफर दिली आहे. मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहणार आहे. त्यामुळे भाजपने शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यावी लागणार आहे.
एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय…
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपची ऑफर नाकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद ही नाकारणार आहेत. शिंदे हे आपल्याऐवजी इतर एखाद्या आमदाराला उपमुख्यमंत्री करू शकतात.
यामध्ये मराठा अथवा मागासवर्गीय आमदाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. केंद्रातही एकनाथ शिंदे जाणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यात आपल्या पक्षाच्या खासदाराला संधी देतील.