मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार ! धमकीचा फोन आल्याने उडाली खळबळ…!
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. फोन कॉलवरून ही धमकी देण्यात आली आहे.
112 क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. यावर मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, एवढंच बोलून हा कॉल कट करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे.
रात्री डायल 112 नंबरवर फोन करून धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजेमधून हा फोन आल्याचे समोर आले आहे. हा धमकीचा फोन करणारा धारावीतील शात्रीनगरमध्ये राहणारा असल्याचे समोर आले आहे.
आता पुणे पोलिसांकडून पथक तयार करण्यात आल आहे. पुणे पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक नेत्यांना गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे धमकीचे फोन येत आहेत.
Views:
[jp_post_view]