मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा ; अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार….!


अयोध्या : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार व भाजपचे काही नेते आयोध्या दौऱ्यावर असतांना राज्यात याच दौऱ्याची मोठी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद सर्वांची संवाद साधला. पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच मोठी घोषणादेखील केली.

 

 

 

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद करताना अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार अशी घोषणा केली. तसेच उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळं नाही. असही शिंदे यावेळी म्हणाले.

 

अयोध्येतील वातावरण राममय झालं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वेगळीच वलय जाणवली. राम मंदिर आमच्या अस्मितेचा विचार. राम मंदिर भारतवर्षासाठी अस्मिता. राम मंदिर हे स्वप्न बाळासाहेबांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. हिंदुत्वाचं प्रतिक आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला वेग आला आहे. मंदिराच कामं इतक्या वेगानं होतयं ही आश्चर्याची गोष्ट आहे. अयोध्येत आलो हा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. माझं जंगी स्वागत झालं. माझ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं नियोजन केलं होतं. राममंदिर राजकारणाचा विषय अजिबात नाही. माझ्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होत आहे. ते जाणून बुजून टीका करतायत. काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदूत्व आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर शिकवतो. मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवत आहेत. असेही यावेळी शिंदे यांनी म्हंटल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!