जगातील २० प्रमुख देशांचे शिक्षणमंत्री पुण्यात येणार; उरुळी कांचन, वळतीसह हवेली तालुक्यातील शाळेला देणार भेट


उरुळी कांचन : जगातील २० प्रमुख देशांचे शिक्षणमंत्री पुण्यात येणार आहेत. १९ ते २१ जून या दरम्यान त्यांचा पुण्यात दौरा आहे. या तीन दिवसात ते उरुळी कांचन, वळती सह हवेली तालुक्यातील १२ शाळांपैकी एका शाळेला भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती आहे.

जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. तसेच वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात.

शाळांची यादी पुढीलप्रमाणे

महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर, बी.जे. हायस्कूल वाघोली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी कंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडबापडळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवासला नं.१, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवासला नं.२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!