हसन मुश्रीफ कनेक्शन! पुण्यात ईडीची 9 बड्या व्यावसायिकांवर छापेमारी…!


पुणे : पुण्यात आज सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली आहे. सकाळ सकाळीच ईडीने पुण्यामधील 9 बड्या व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू केली आहे. या व्यावसायिकांवर छापेमारी करण्याचं कनेक्शन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असल्याचं सांगितलं जात आहे.

आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील 9 व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू केली आहे. सिंहगड रोड आणि शिवाजी नगर परिसरात हे व्यावसायिक राहतात. तिथेच त्यांचे कार्यालयही आहे. ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली, तिथे सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही आत सोडण्यात येत नाहीये. तसेच आतील लोकांना बाहेर जाण्यास येत नाही आहे. याशिवाय या व्यावसायिकांच्या कुटुंबातील लोकांना कुणालाही फोन करण्यास मज्जाव करण्यात आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!