पुण्यात ईडीची छापमारी, ४०० कोटींचा घोटाळा, जिल्ह्यात खळबळ….!
पुणे : गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून अनेकांची चौकशी केली जात आहे. तसेच छापमारी देखील केली जात आहे. असे असताना आता पुण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी कारवाई सुरु आहे.
यामध्ये सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले.
यामुळे याची आता चौकशी केली जाणार आहे. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही, यामुळे आता अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.
सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले होते. यामध्ये अनेकांची नावे पुढे आली होती. तसेच पिंपरी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता.
त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. दरम्यान, बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यवधींचा पैसा आहे. यामुळे हा पैसा आता अडकला आहे.