डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय, शरद पवारांना धमकी आल्यानंतर अजित पवारांचे मोठे वक्तव्य

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अलीकडे सोशल मीडियावर काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमी युगुलांनी घेतला मोठा निर्णय, घटनेने देश हादरला..
काही पक्षांबाबत, नेत्यांबाबत लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. उदाहरण म्हणजे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार अशी खुशाल चुकीची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली.
शरद पवार इतकी वर्षं काम करत असताना चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. दिलगिरी व्यक्त करण्याआधी बातमी खरी आहे की खोटी हे तपासलं पाहिजे,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, तुझाही दाभोळकर..
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनी धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निलेश राणेच्या कानाखाली जो वाजवेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस! राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा..
हा विकृतपणा असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे. तसंच धमकी देणाऱ्याच्या ट्वीटर बायोमध्ये भाजपा कार्यकर्ता उल्लेख असून त्यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.