उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली) येथील अजिंक्य चारीटेबल फाउडेशन डॉ. आस्मिता प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या विद्यार्थीच्या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य दादा कांचन, डायरेक्टर डॉ. आपासाहेब जगदाळे सर , प्राचार्य. जगताप मॅडम, उपप्राचार्य चव्हाण मॅडम, व सर्व टॉप यांनी विद्यार्थीचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान इयता दहावीची पहिलीच बॅच असताना १०० टक्के निकाल लागल्यामुळे उरुळी कांचन व परिसरातून व पालक वर्गातून विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे. अशीच निकालाची भविष्यात परंपरा राहील अशी पालकांना खात्री आहे.
पहिले तीन गुणवंत विद्यार्थी
रक्षा निलेश ओसवाल – ८९. २० टक्के
अनुजा रोहिदास टिळेकर – ७६. ८० टक्के
ऐश्वर्या राजू हागलदुडगे – ७६.६० टक्के