मुंबईतील भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतही वेगळीच माहिती समोर, भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता..

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणात भाजप सरकार अडचणीत आले आहे. अनेक प्रकरणे सध्या पुढे येत आहेत. असे असताना आता राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन ची ९९ वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे, असे दाखवण्यात आली आहे.
नंतर ती जागा ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे. एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतच चर्चा सुरु असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.

यामुळे याबाबत आता भाजपकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणे योग्य राहील. असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे. यामुळे मात्र भाजप समोरील अडचणीत वाढ झाली आहे.