पतीला रोज गुंगीचं औषध देऊन प्रियकराला घरी बोलवायची? नवऱ्याचा काटा काढल्याचा आरोप; ९ दिवसांनी कबरीतून बाहेर आलं मृत्यूच भयंकर गुपित!


मेरठ, उत्तर प्रदेश : पतीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचं सांगण्यात आलं, कुटुंबीयांनी मृतदेह दफनही केला; पण मानेवरील संशयास्पद खुणांनी संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण दिलं. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तालिब (३०) याच्या मृत्यूचा तपास करताना शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचा निष्कर्ष समोर आला. यानंतर पोलिसांनी पत्नी इल्माला अटक केली असून, तिचा कथित प्रियकर अमन याचा शोध सुरू आहे.

तालिब हा मुजफ्फरनगर जिल्ह्यातील रसूलपूर-डाभेडी गावचा रहिवासी होता. तो गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. चार वर्षांपूर्वी त्याचं इल्माशी लग्न झालं होतं. या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी आहे. दोघे मेरठच्या झाकीर नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. इल्मा जवळच्या सौंदर्यप्रसाधन केंद्रात काम करत होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे १३ महिन्यांपूर्वी इल्माची अमनशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये फोन आणि समाजमाध्यमांवरून संपर्क वाढला. इल्मा पतीच्या जेवणात गुंगी आणणारं औषध मिसळत असल्याचा आरोप आहे. तालिबला पत्नीच्या कथित संबंधांची माहिती मिळाल्यानंतर घरात वाद होऊ लागले होते.

२८ सप्टेंबरच्या रात्री तालिबला गुंगी आणणारं औषध मिसळलेलं जेवण देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर अमनला घरी बोलावून दोघांनी मिळून तालिबचा गळा आवळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचं सांगण्यात आलं आणि मृतदेह दफन करण्यात आला.

मात्र, तालिबच्या मानेवरील खुणांमुळे नातेवाइकांना संशय आला. त्यांनी तक्रार केल्यानंतर ८ ऑक्टोबरला, मृत्यूच्या नऊ दिवसांनी, मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आलं. त्यात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं. तालिबच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून इल्माला अटक झाली आहे. अमनचा शोध सुरू असून, कथित विषप्रयोग, हत्येची परिस्थिती आणि दोघांची भूमिका यांचा तपास केला जात आहे. आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!