Dhangar Reservation : आरक्षणासाठी अजून किती बळी जाणार? आता मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेत आत्महत्या….

Dhangar Reservation : सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. आता एका तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Dhangar Reservation

सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोणीकुर येथील आबाचीवाडी या ठिकाणच्या एका तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या तरुणाने शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बिरुदेवच्या आत्मतहत्येने घटनास्थळी गावात एकच शोककळा पसरली आहे.
याबाबत तरुणाने एक चिठ्ठी लिहीत आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांकडून देखील धनगर आरक्षणासाठी सदर तरुणांकडून आत्महत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. सध्या या घटनेची नोंद पोलिस ठाण्यामध्ये झाली असून याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगलीच्या आरेवाडी या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. तर दुसरीकडे या तरुणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी देखील आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
