धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची याचिका फेटाळली, कुणी केली होती याचिका दाखल..!!
Dhangar Reservation : राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच हायकोर्टाने धनगर समाजाला मोठा झटका दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याबद्दलची मागणी धनगर समाजाकडून वारंवार केली जात होती. याबद्दल हायकोर्टाने आज निकाल देत ही मागणी फेटाळून लावली आहे.
धनगर समाजाला एसटी कॅटेगिरी मधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने यशवंत सेनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे या निकलाकडे लक्ष लागले होते, दरम्यान याचिका फेटाळल्याने धनगर समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यासंबंधी रस्त्यावरील लढाई सोबतच २०१७ पासून यासंबंधीचा न्यायालयीन लढा देखील सुरू होता. मात्र आज याबाबत सुनावणी पार पडली असून न्यायालयाने निकाल देत आरक्षणाची मागणी फेटाळून लावली आहे.