धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? बीडमधून धक्कादायक माहिती समोर..


बीड : निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते. ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असं रंजित कासले यांनी म्हटलं होतं.

त्यांनी यावेळी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं. त्यातील साडेसात लाख रुपये आपण वापस केले, तर उरलेल्या अडीच लाख रुपयांमधून माझा खर्च सुरू आहे, असं कासले यांनी म्हटलं होतं. कासले यांच्या आरोपांनंतर आता माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रंजित कासले यांनी असा दावा केला की, ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये देण्यात आले होते. एवढंच नव्हे तर त्यांनी आपलं बँक स्टेटमेंट सादर करत त्यातील साडेसात लाख रुपये परत केल्याचंही सांगितलं. उरलेली रक्कम अडीच लाख रुपये असल्याचे सांगत त्यांनी त्यातून सध्याचा खर्च चालवला जात असल्याचंही स्पष्ट केलं.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी नेते राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जर एका कासलेला १० लाख रुपये दिले असतील, तर इतर पोलीस अधिकाऱ्यांना किती दिले गेले असतील? असा प्रश्न देशमुखांनी उपस्थित केला आहे.

कासले यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनुसार, निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली होती.

त्यांनी असंही म्हटलं की, वाल्मिक कराड यांच्या एन्काऊंटरविषयीची चर्चा देखील बंद दरवाजामागे झाली होती. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर नव्याने संशयाचे सावट निर्माण झाले आहे. विरोधक या संधीचा उपयोग करून त्यांच्यावर राजकीय आणि कायदेशीर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!