Devendra Fadnavis : लोकसभेतील पराभवानंतर डँमेज कंट्रोलसाठी देवेंद्र अस्त्र राज्यात चालणार का? राजीनामा पक्षाने नाकारला पण….
Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.
महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
घटक पक्षात ही कुरबुरी सुरु झालेल्या आहेत. तर या अपयशी खेळीमुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला. ते राजीनामा देण्यावर ठाम होते. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला .
पण महायुतीसाठी ही एक धोक्याची घंटा आहे.. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या हाराकिरीने महायुतीला धक्का बसला. तसेच घटक पक्षातही कुरबुरी सुरु झालेल्या आहेत. तर या अपयशी खेळीमुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला. Devendra Fadnavis
ते राजीनामा देण्यावर ठाम होते. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला असला तरी, आता एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
लोकसभा निकालात भाजपला त्यांचे लक्ष्य गाठता आले नाही. प्रत्येक पक्ष लोकसभा निकालानंतर कुठे कमी पडलो, कुणाची साथ मिळाली नाही. नाराजीची कारणं काय, सर्वांचा सांगोपांग विचार करत आहे. भाजपमध्ये पण या हाराकिरीचे मंथन होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली.
राज्यात महायुती धोक्यात?
महाराष्ट्रात तीन वर्षांपासून सत्तेत असूनही भाजप आणि महायुतीला लोकसभेत कामगिरी बजावता आली नाही. महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली. आता चार महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.
राज्यातील सर्वात मोठा गड विदर्भातील हारकिरी पक्षाला झोंबली आहे. हा गड मजबूत करण्यात येणार आहे. तर इतर क्षेत्रातील हक्काचे मतदार संघ गेल्याने तिथे डॅमेज कंट्रोल करण्यात येणार आहे.
यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महायुतीबाबत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचा पुनर्विचार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीतून कोणाला बाहेरचा रस्ता दाखविला जातो की जागा वाटाघाटीत भाजप मुस्काटदाबी करते हे लवकरच समोर येईल.