Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग..
Devendra Fadnavis : भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमृता फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीनंतर फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Devendra Fadnavis
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित विजय मिळाला नाही म्हणून फडणवीस यांनी सत्ताकेंद्रातून बाहेर पडून पक्षाचे काम करण्याची मागणी केली होती. यावेळी फडणवीस यांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची अपेक्षा होती.
परंतू, केंद्रीय नेतृत्वाने एवढ्यात सत्ता सोडू नये, असे समजावत फडणवीस यांना त्यांची भूमिका मागे घेण्यास लावली होती. राज्यातलं सरकार चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहेभाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीसांचे नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.