Devendra Fadnavis : फडणवीसांचा शपथविधी काही तासांवर असताना ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टीची मागणी..

Devendra Fadnavis : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. या नेतृत्वातील सरकारच्या शपथविधीस काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने भाजपमध्ये एकाबाजूला आनंदाच वातावरण असतानाच आता पक्षातूनच एका आमदाराच्या हकालपट्टीची मागणी जोर धरु लागली आहे.
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातूनच विरोध वाढला आहे. ते भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत. रणजीतसिंह मोहिते पाटलांसारखी कीड भाजपात नको, त्यांची आमदारकी काढून घेऊन त्यांना पक्षातून काढा” भाजपचे प्रदेश पदाधिकारी संतोष पाटील यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. Devendra Fadnavis

काल रणजितसिंह मोहिते पाटील हे विधिमंडळातील गटनेता निवडीसाठी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. रणजितसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत.
लोकसभा निवडणुकीपासूनच मोहीते पाटील कुटुंब आणि भाजपमधील अंतर वाढलं. लोकसभा निवडणुकीत भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून तिकीट दिले.
त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील तुतारी चिन्हावर माढ्यातून लोकसभेची निवडणूक जिंकले.