हवेलीत आघाडी पॅटर्नला देवेंद्र फडणवीस यांचे बळ ! ‘यशवंत’ कारखान्याला करणार मदत …!

उरुळी कांचन : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या बंडखोर पदाधिकाऱ्यांसह भाजपने बाजार समितीत बाजी मारल्याने बाजार समितीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना यशवंत कारखान्याच्या प्रश्नात पूर्ण मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीत दिले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून कारखाना सुरू होण्याच्या प्रयत्नांचा विषय बाजार समितीच्या अजेंड्यावर येणार आहे.
हवेली (पुणे ) बाजार समितीची तब्बल १९ वर्षानंतर निवडणूक होऊन बाजार समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर व भाजप सहीत सर्वपक्षीय पॅनेलला १५ पैकी १३ जागांवर यश मिळाले आहे. या निवडणूकीनंतर भाजपला बाजार समितीत उपसभापती पद मिळाले आहे. प्रथमच या बाजार समितीत भाजप सत्ताकेंद्रात पोहचली आहे.
त्यामुळे सहाजिकच बाजार समितीच्या सत्ताकेंद्राने भाजपचा जणाधार वाढणार आहे. आता या बाजार समितीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे दौऱ्यात भेट घेतली आहे. या भेटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाचे कौतुक करुन बाजार समितीसह थेऊर (ता.हवेली ) यशवंत कारखान्यात सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान तब्बल २३ वर्षानंतर बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ विराजमान झाल्याने बाजार समितीच्या माध्य मातून कारखान्याला मदत करण्याचे धोरण संचालक मंडळाक डून करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या सव्वाशे कोटींच्या ठेवीतून कारखान्याला मदत होते काय ? याबाबत चर्चा सुरू आहे.
कारखान्याची जमिन खरेदी करण्याचा मुद्दा समितीच्या अजेंडावर येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या परवानगी देऊ शकते याबाबत ची चर्चा आहे.त्यामुळे कारखाना निवडणूकीच्या तोंडावर आघाडी पॅटर्न सभासदांपुढे हा मुद्दा घेऊन निवडणूकीला समोरे जाण्याची तयारी सुरु झाली आहे.