Devendra Fadnavis : मोठी बातमी! कैद्यांना जेलमध्ये मिळणार आता पाणीपुरी आणि आईस्क्रीम, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय..

Devendra Fadnavis : कैद्यांसाठीही एक आनंदाची गोष्ट आहे. जेलमध्ये कैद्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम येणार असल्याचे पत्र काढण्यात आले आहे. हा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

पाणीपुरी आणि आईस्क्रीम सोबतच चाट मसाला, ताज पाणी, चेस बोर्ड, लोणचे, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ, शुगर स्वीटनर, पनीर बटर, पाणीपुरी, कलरिंग मटेरियल या वस्तूंची यादी करण्यात आली आहे. तुरुंगातील कॅन्टीनच्या यादीत १७३ नव्या पदार्थांची भर पडली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांना विविध अन्न पर्यायी उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. Devendra Fadnavis

त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैद्यांना कारागारगृहातून त्यांच्या कुटुंबीयांशी आणि वकिलाशी आठवड्यातून फोनवर दहा मिनिटे बोलण्याची सवलत देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, फेस वॉश, केसांचा रंग इत्यादी वैयक्तिक काळजीच्या वस्तूंचाही समावेश आहे. धूम्रपान करण्याची इच्छा कमी करण्यासाठी निकोटीन-आधारित गोळ्यांना देखील परवानगी आहे. हा निर्णय कैद्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
कैद्यांना विविध अन्न पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.