Devendra Fadnavis : …तेव्हाच एकनाथ शिंदे तयार झाले!! शपथविधी पार पडताच देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच सांगून टाकलं


Devendra Fadnavis : राज्यात नव्या सरकारचा शपथविधी काल पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली होती.

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता मुलाखतीमध्ये सत्तास्थापनेला झालेला उशीर आणि महायुतीत नाराजी होती का यावर खुलासा केलाय. तसंच मी पुन्हा येईन यावरून ट्रोल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा निकालानंतर सुरू होत्या. याबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं अशी काही परिस्थिती नव्हती. Devendra Fadnavis

एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा मी सांगितलं होतं की मलाही मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण पक्षाने मला सांगितलं. त्यावेळी माझ्याही लक्षात आलं की सरकार चालवायचं असेल तर पक्षाचा जो मजबूत व्यक्ती असतो, ज्याला अधिकार असतो तो सरकारमध्ये असेल तर पक्षही चालतो. हे शिंदेंना सांगताच एकाच मिनिटात ते सरकारमध्ये येण्यास तयार झाले. शिंदेंनी सांगितलं की माझा काही विषय नाही, तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा मी मंत्री होतो. असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!