Devendra Fadnavis : विधानसभेसाठी भाजपने फुंकले रणशिंग, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बनवले गाणे..


Devendra Fadnavis : भाजपकडून लाडकी बहीण योजनेचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे. त्यासाठी ‘बहिणींचा भाऊ देवा भाऊ’ अशी जाहिरात भाजपकडून मोठ्या प्रमाणत करण्यात आली.

महिलांना १५०० हजार रुपये देणाऱ्या देवा भाऊला धन्यवाद असे बॅनर मुंबई नव्हे तर राज्यभर लावण्यात आले होते. आता देवेंद्र फडणवीस समर्थकांनी पुढचे पाऊल टाकले आहे. थेट देवा भाऊ नावाने देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून गाणे तयार करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्र देवेंद्र फडणवीसच सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाणे तयार केले आहे. Devendra Fadnavis

‘देवा देवा, देवा भाऊ’ असे बोल या गाण्याचे आहेत. त्यात रामभक्त आणि शिवभक्त म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला गेला आहे. या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत? यासंदर्भातील माहिती गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!