यवत येथे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना, नागरिकांकडून घटनेचा निषेध…

दौंड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना रात्री उशिरा एका युवकाने केली आहे. ही घटना यवत (ता.दौंड) रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणाऱ्या नीलकंठेश्वर मंदिरात घडली आहे.
नागरिकांकडून घटनेचा निषेध…
सकाळी पूजेला आल्यानंतर पुजाऱ्याला ही माहिती मिळाली सदर माहिती वाऱ्याप्रमाणे संपूर्ण गावात पसरली. यानंतर शेकडो नागरिकांनी एकत्र येत सदर घटनेचा निषेध केला घटनेची माहिती मिळताच सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करत घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
दरम्यान, आरोपी अजून फरार असून उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यवत पोलीस स्टेशन येथे आलेले आहेत यवत गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.
Views:
[jp_post_view]