दहा दिवसात दुसऱ्यांदा मूर्तीची विटंबना! ग्रामस्थ आक्रमक, घटनास्थळी तणावाचे वातावरण…


मुंबई : राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे रेल्वे स्टेशनसमोरील हनुमान मंदिरातील श्री हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आली. यामुळे सगळेच ग्रामस्थ संतप्त झाले. नंतर गावाबाहेरील मुदगलेश्वर मंदिराच्या पाठीमागील पुरातन घृष्णेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची तसेच त्यासमोरील असणाऱ्या नंदीची विटंबना करण्यात आली.

अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असून याबाबत तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुणतांबा ग्रामस्थ व युवकवर्ग आक्रमक होत त्यांनी श्रीरामपूर कोपरगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. या घटनेमुळे गाव व बाजार बंद ठेवण्यात आला.

घटनेचा तपास त्वरीत लावावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. माजी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. यानंतर याठिकाणी पाहणी करण्यात आली.

पुणतांबा परिसरात धार्मिक स्थळांच्या विटंबनेची दुसरी घटना आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलिस अधिकारी वमने यांनी ग्रामस्थांना रस्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले, परंतु आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गेल्या १० ते १५ दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाशेजारील मंदिरातील मूर्तीची एका माथेफिरू व्यक्तीने विटंबना केली होती. त्यास ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले होते, मात्र नंतर देखील अशीच घटना घडल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!