दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के…!
रीश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.5
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतातही दिसून आला, लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.5 इतकी मोजली गेली आहे.
उत्तर – आयआयटी कानपूरच्या संशोधनाने भारत आणि नेपाळमध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपांबाबत मोठा दावा केला आहे. यानुसार भारतातील हिमालयीन राज्यांमध्ये कधीही भयंकर भूकंप येऊ शकतो. हा भूकंप 1505 आणि 1803 मधील भूकंपांसारखा असू शकतो.
कानपूर स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि भूविज्ञान अभियांत्रिकीतील तज्ज्ञ प्रा. जावेद एन मलिक म्हणाले, ‘2015 मध्येही नेपाळमध्ये 7.8 ते 8.1 तीव्रतेचे भूकंप झाले हादरे बसत होते. त्यानंतर आठ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 20 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळ होता. त्यामुळेच त्याचा भारतावर परिणाम झाला नाही. तथापि, हिमालय पर्वतरांगातील टेक्टोनिक प्लेट अस्थिर बनली आहे. त्यामुळे असे भूकंप दीर्घकाळ होत राहतील. यावेळी भूकंप होण्यामागे हे देखील एक मोठे कारण आहे. नेपाळमध्ये हे धक्के उत्तराखंडला लागून असलेल्या हिमालयीन रांगेत बसतात. त्यामुळेच त्याचा परिणाम दिल्ली एनसीआरपर्यंत दिसून येत आहे.