Delhi Farmer : शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा एल्गार!! लाखो शेतकरी करणार दिल्लीत आंदोलन…
Delhi Farmer : दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू बॉर्डर येथे रस्त्यावर टाकण्यात आलेले रोडब्लॉक्स हटवण्याचे आदेश हायकोर्टाने नुकतेच दिले होते. त्यानंतर हरियाणा सरकारकडून हे रोडब्लॉक्स हटवण्यात येणार आहेत.
अशातच आता शंभू बॉर्डर खुली करतात शेतकरी हमीभावाच्या गॅरंटी साठी दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी जंतर-मंतर मैदानावर ते आंदोलन करणार आहेत.गेल्या फेब्रुवारीपासून हे शेतकरी हरियाणामध्ये शंभू बॉर्डरवर आंदोलन करत होते.
केंद्र सरकारने पिकांच्या हमीभावाची जबाबदारी स्वीकारलेली नाही या कारणावरून या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यापासून आंदोलन सुरू केले होते. फेब्रुवारीतच दिल्लीत पोहोचण्याचा त्यांचा निर्धार होता. Delhi Farmer
परंतु हरियाणा सरकारने दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅॅरिकेट्स लावल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती , मात्र यावरून नाकाबंदीमुळे प्रवास करणाऱ्यांना त्रास होत असल्याने या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यामध्ये उच्च न्यायालयाने हे बॅरिकेट्स हटवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या निर्णया विरोधात हरियाणा सरकार सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील करणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी आमच्या आंदोलन जंतर-मंतर मैदानात किंवा रामलीला मैदानामध्ये शांततापूर्ण करू अशी ग्वाही दिली आहे. भारतीय किसान युनियन एकता संघटनेने या संदर्भात सरकारने आता शांत रहावे अशी मागणी केली आहे.