Deepika Padukone : कुणी तरी येणार गं! दीपिका-रणवीर लवकरच होणार आई-बाबा, पोस्ट शेअर करत दिली माहिती…

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत या कपलने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “सप्टेंबर 2024”. याचा अर्थ दीपिका आणि रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये बाळाचं आगमन होणार आहे.

खरं तर गेल्या दोन -तीन वर्षांत दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा अनेकदा झाल्या. पण आता तिनं ही गोड बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांनी अभिनंदानाचा वर्षाव केला आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत देखील लाडक्या जोडीचं अभिनंदन करत आहेत. Deepika Padukone

दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार हे ऐकण्यासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक होते. अखेर आज या कपलने आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली. ही गुड न्यूज कळताच दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सध्या चाहत्यांकडून या कपलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसंच अनेक सेलिब्रिटींनी देखील या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दीपिका पदुकोण प्रग्नेंट असल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली होती जेव्हा तिने लंडनमध्ये पार पडलेल्या ७७ व्या बाफ्टा अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. या अवॉर्ड शोमध्ये तिने सुंदर साडी नेसली होती. यावेळी ती बेबी बंप लपवताना दिसली होती.
त्यामुळे दीपिका लवकरच आई होणार असल्याचे म्हटले जात होते. आता या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. कारण दीपिका पदुकोणने स्वत:च आई होणार असल्याचे जाहीर केले आहे.