खासदार ब्रिजभूषण, संजय सिंह यांना जीवे मारण्याची धमकी..!!
लखनऊ : भाजपचे केसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबीत अध्यक्ष संजय सिंह बबुल यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारीला रात्री संजय सिंह यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. अनोळखी नंबर असल्यामुळे त्यांनी फोन उचालला नाही. १३ जानेवारी रोजी त्याच नंबर वरून परत-परत फोन येऊ लागले असताना संजय सिंह यांनी फोन उचलला. त्यांनंतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच भाजपचे खाजदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
नंबर वरून येणाऱ्या सतत फोनमुळे मी आणि माझे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे असे संजय सिंह यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.