राजगडच्या पायथ्याशी MPSC पास तरुणीचा मृत्यू, संशयास्पद गोष्टींनी गूढ वाढले…


पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे.

दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही समोर आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार असे या तरुणीच नाव असून ती ८ दिवसांपासून बेपत्ता होती. तसेच ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती.

मात्र,राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळला आहे. वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ही आत्महत्या कि घातपात याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. तिच्या बाजुला पांढ-या रंगाचे बुट, गुलाबी कव्हर असलेला मोबाईल, काळ्या रंगाचा गॉगल, काळ्या रंगाची बॅग, काळ्या निळ्या रंगाचे जर्कींग पडलेले सापडले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!