लाडक्या बहिणींना मिळणार आनंदाची बातमी! मिळणार डबल गिफ्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती..


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या प्रक्रियेची मदत वाढवण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला. मात्र असं असलं तरी नोव्हेंबर महिन्याचे २४ दिवस उलटूनही महिलांच्या खात्यात यावेळचे १५०० रुपये काही जमा झालेलेल नाहीत.

हा महीना संपायला अवघे ५-६ दिवस उरलेत, तरी त्यांच्या नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत काहीच तपशील कळत नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता या लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली असून, त्यांना आता डबल गिफ्ट मिळणार आहे.

लाडक्या बहिणींना नोव्हेंरचे पैसे अद्याप न मिळाल्याने चिंतेचं वातावरण होतं, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांची तारीख घोषित झाल्याने आचारसंहिताही सुरू आहे. त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार, आत्ता मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात घुमत होते.

पण आता काळजीचं कारण नाही. माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ना डबल गिफ्ट मिळणार आहे. प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सतत मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात या प्रक्रियेची घोषणा करण्यात आली होती आणि सुरुवातीला अंतिम तारीख १८ नोव्हेंबर होती. मात्र लाखो महिलांचे ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणींमुळे अद्याप पूर्ण झाले नव्हते.

त्यामुळे शासनाने मोठा निर्णय घेत मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. जर पात्र महिलांनी ही प्रक्रिया या वेळेत पूर्ण केली नाही तर पुढील हप्ते रोखले जाऊ शकतात आणि लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!