लाडक्या भहिणींनो बँक खाते चेक करा, आज जमा झाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, ‘असं’ करा चेक….


मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते. पण आता प्रतिक्षा संपलेली आहे. अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे. यामुळे बहिणींची चिंता मिटली आहे. मात्र 9 लाख महिला यापासून वंचीत राहणार आहेत. त्या नियमात बसणार नाहीत. याबाबत फेरतपासणी केली गेली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस (SMS) येईल. बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.

तसेच नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता. डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता. बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.

दरम्यान, अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात आले आहे. यापैकी काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला, त्यांना आता लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असेही सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!