म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यात ५३ जण ठार…!
नेपयितव : म्यानमार मध्ये गृहयुद्ध सुरु आहे. याचदरम्यान म्यानमार लष्कराने केलेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यात किमान ५३ जण ठार झाले आहेत. हल्ल्यातून वाचलेल्यांचे म्हणणे आहे की मृतांमध्ये किमान १५ महिला आणि अनेक मुले आहेत.
लष्करी सरकारला विरोध करणा-या सांिगग प्रदेशातील एका गावाला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले असल्याचे वृत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून लष्कराने विरोधकांवर हवाई हल्ले केले आहेत. सांिगगच्या समुदायांनी म्यानमारमधील लष्करी राजवटीला जोरदार विरोध केला आहे, ते स्वत:च्या शाळा आणि दवाखाने चालवत आहेत.
एका गावक-याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लष्करी जेटने सकाळी ७.०० वाजता उड्डाण केले आणि बॉम्ब टाकला, त्यानंतर हेलिकॉप्टर गनशिप वीस मिनिटे गावाला प्रदक्षिणा घालत होती.
Views:
[jp_post_view]