पुणेकरांनो, तयार राहा! पुढील 2 दिवसांत थंडीचा जोर वाढणार; तापमानात मोठी घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज


पुणे : दिवाळीनंतर पुणे शहरात हळूहळू थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. रात्री आणि पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव येत असला, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. मात्र, आता पुणेकरांना आणखी थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून रात्रीच्या गारठ्यात वाढ होणार आहे.

सध्या पुण्यात कसं आहे हवामान?

पुणे शहर आणि परिसरात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री गारवा जाणवत असून दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. शुक्रवारी (ता. १३) शहराचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र, किमान तापमानात किंचित घट होऊन पारा १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत किमान तापमान आणखी घसरण्याचा अंदाज आहे.

NDA परिसरात सर्वात कमी तापमानाची नोंद

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) परिसरात सर्वात कमी तापमानाची नोंद होत आहे. NDA परिसरात किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर लोहगावमध्ये १६.४ अंश आणि चिंचवड तसेच मगरपट्टा परिसरात १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, आगामी दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने पुणेकरांना पहाटे आणि रात्री वाढत्या थंडीचा अनुभव येऊ शकतो. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारठा असे संमिश्र वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!