Daund : केडगावच्या पंडित रमाबाई संस्थेचा विषय विधानसभेत, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा गुन्हा अखेर दाखल…

Daund : दौंड तालुक्यातील केडगाव येथील ऐतिहासिक पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही संस्था काल विधानसभेच्या अधिवेशनात गाजली, तर दुसरीकडे शुक्रवारी (ता.१२) या संस्थेच्या एका अधिकाऱ्यावर तीन अल्पवयीन मुलीवर आणि एक सुज्ञान मुलीवर लैंगिक अत्याचार यकेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केडगाव येथील ऐतिहासिक पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव येथील पंडिता रामाबाई मुक्ती मिशन ही संस्था सध्या हिंदुत्ववादी संघटनेच्या हिट लिस्टवर आहे. या संस्थेत सक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप आहे. यापूर्वीही विविध आरोप या संस्थेवर झाले आहेत.
या संस्थेत असलेल्या अनाथ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असून हे प्रमाण जास्त असून काही प्रकरणे दडपले जातात असा आरोप या संस्थेवर यापूर्वी वारंवार झाला आहे. Daund
तसेच अधिवेशनात या संस्थेतील कथित धर्मांतराचा मुद्दा चर्चेत आला. या संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे या संस्थेतील फायनान्स मॅनेजर भास्कर निरुगुट्टी या आरोपीवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, १७ एप्रिल २०२४ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शुक्रवारी (ता.१२) गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप करत आहेत.