Daund News : खडकवासला मुठा कालवा लोणीकाळभोर पर्यंत बंद नलिकेतून करण्याची योजना! अशियन विकास बँकेच्या शिष्टमंडळाची प्रकल्पास स्थळ पाहणी भेट..


Daund News दौंड :  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये अशियन बँकेच्या सहकार्याने राज्य शासन खडकवासला कालवा ते फुरसुंगी लोणी काळभोर पर्यंत सुमारे २८ किमी बंदनळी कालवा, खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या आदींच्या दुरुस्ती, बांधकाम, विस्तार सुधारणा आदींसाठी सुमारे ३५०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे घोषित केले होते. Daund News

त्यानुसार या प्रकल्पाच्या संबंधित ठिकाणांच्या स्थळपाहणीसाठी अशियन विकास बँकेच्या शिष्टमंडळ पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून प्रकल्पासंबंधीत विविध ठिकाणांना भेट देत आहेत. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशियन विकास बँकेच्या शिष्टमंडळासह आमदार राहुल दादा कुल यांची सदिच्छा भेट घेतली. Daund News

यावेळी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी खडकवासला सिंचन प्रकल्पासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. तसेच या प्रकल्पाद्वारे सदर सिंचन प्रकल्पांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अनेक कामे मार्गी लागणार त्याद्वारे सुमारे ३-४ टिमसी पाण्याची बचत होणार असून त्याचा फायदा हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे नमूद केले या प्रकल्पासाठी अशियन विकास बँकेच्या सहकार्याबद्दल शिष्टमंडळाचे आभार मानले.

यावेळी अशियन बँकेच्या शिष्टमंडळामध्ये मेरी लहोस्टिस, ब्रँडो एंजेलिस, ख्रिस डनलॉप, एम के मोहंती, विकास गोयल, रायलदा सुसुलन, रँडल जोन्स, बर्नहार्ड स्टॅचरल, अलन क्लार्क यांचा सहभाग होता यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, यांच्यासह योगेश सावंत, उपअभियंता सुहास साळुंके, सचिन पवार, शंकर बनकर आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!