Daund News : रातोरात जनावरे चोरणारी टोळी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली, म्हशी चोरणाऱ्या दोघांना अटक, दौंड पोलिसांनी २४ तासात आवळल्या मुसक्या…

Daund News : दौड पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती . मात्र दोन पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत म्हशी चालणाऱ्या दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सुमित मिनीनाथ चितारे (वय २४ रा आलेगाव ता दौड जि पुणे), अंकुश नाना जाधव (वय ३६ मुळ रा पेडगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर सध्या रा आलेगाव काळेवाडी ता दौड जि पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी की, आलेगाव येथील शेतकरी प्रमोद सुभाष काळे त्यांच्या गोठ्यातून मंगळवारी (ता. २८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या आसपास २ लाख रूपये किमतीच्या दोन काळ्या रंगाच्या म्हसान जातीच्या म्हशी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. याबाबत काळे यांनी बुधवारी (ता.२९) फिर्याद दिल्याने दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्दात गुन्हा दाखल करण्यात आला होता.Daund News

दौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दौड पोलीस स्टेशन कडील तपास पथक तयार तपासाची सूत्रे हलवली आणि २४ तासाच्या आत आलेगाव येथील काळेवस्तीतुन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.