दौंड-मनमाड स्थानकादरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल…!
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2023/03/trains.jpeg)
पुणे : सोलापूर रेल्वे विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील बेलापूर-चितळी-पुणतांबा रेल्वे स्थानका दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांचे वेळा पत्रक बदलले आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा देखील बदलल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दुहेरी करणाच्या कामासाठी बेलापूर-चितळी-पुणतांबा रेल्वे स्थानका दरम्यान, मेगाब्लॉक घोषित केला आहे. याकारणाने वेळेत/मार्गात बदल पुढीलप्रमाणे :
(i )( दि .28 मार्चला) सुटणारी गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र, ट्रेन क्रमांक 12114 नागपुर – पुणे, गाडी क्रमांक 17630 नांदेड-पुणे त्याचबरोबर (दि. 29 मार्च ) ला सुटणारी गाडी क्रमांक 17629 पुणे-नांदेड,12113 पुणे-नागपूर तसेच (दि.30 मार्च) रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11040 गोंदिया-कोल्हापूर रद्द राहील, तर गाडी क्रमांक 11410 निजामाबाद-पुणे (दि.01 एप्रिल) पर्यंत रद्द राहणार आहे.
(ii) गाडी क्रमांक 22845 पुणे – हटिया एक्सप्रेस (दि.29 मार्च)) रोजी पुण्याहून सुटणारी गाडी 10.45 च्या नियोजित सुटण्याच्या वेळेऐवजी 17.55 वाजता सुटेल.
(iii) गाडी क्रमांक 12147 कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (28 मार्च) रोजी कोल्हापूरहून सुटणारी तसेच , गाडी क्रमांक 12629 यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस यशवंतपूरहून सुटणारी गाडी आणि गाडी क्रमांक 11033 पुणे-बनारस एक्स्प्रेस (29 मार्च) रोजी पुण्याहून लोणावळ्याकडे वळवण्यात आली आहे.तसेच गाडी क्रमांक 12130 (27 मार्च) रोजी हावडाहून सुटणारी पुणे एक्स्प्रेस गाडी पनवेल-कल्याण-मनमाड मार्गे धावेल, तर हातियाहून सुटणारी हातिया-पुणे एक्स्प्रेस गाडी क्रमांक 22846 ही नागपूर-बल्लारशाह-वाडी-सिकंदराबाद-दौंड या वळवलेल्या मार्गाने धावेल याची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.