दौंड तालुक्यातील सात जणांचे मृतदेह सापडेल्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर! पूर्ववैमन्यशातून चुलत भावांनीच केली सात जणांची हत्या…!


यवत : दौंड तालुक्यातील पारगाव भीमा नदी पात्रात मागील सहा दिवसांपासून सापडलेल्या ७ मृतदेहांचे गुपीत उलगडण्यात जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अखेर यश आले आहे. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या तपासात या सात जणांची आत्महत्या नसून पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा उलगडा झाला असून, या सातही हत्या चुलत भावांनीच केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

पोलिसांनी हत्या करणाऱ्या चार चुलत भावांना काल (मंगळवारी) रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्यांची एक महिला साथीदार अद्यापही फरार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

मोहन उत्तम पवार (वय ४५), पत्नी संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव ता. गेवराई जि.बिड ), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४), जावई शाम पंडीत फुलवरे (वय २८), नातू रितेश उर्फ भैया शाम फलवरे (वय ०७), छोटु शाम फलवरे (वय ०५) व कुष्णा शाम फलवरे (वय ०३ सर्व रा. हातोला ता. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद) अशी एकूण ७ मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत भीमा नदी पात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवारी (ता. १८) एका स्त्रीचा मृतदेह, शुक्रवारी (ता.२०) पुरुषाचा मृतदेह, शनिवारी (ता. २१) पुन्हा स्त्रीचा तर रविवारी (ता. २२) एका पुरुषाचा मृतदेह असे चार मृतदेह सापडले होते. तर आता याच कुटुंबातील तीन लहान मुलांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात मंगळवारी (ता.२४) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आढळले आहेत.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली होती. आणि जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या ७ जणांच्या आत्महत्येचे गूढ उलघडले आहे.

पूर्व वैमन्यासातून हत्या झाल्याचा उलगडा झाला असून या सातही हत्या चुलत भावांनी केल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. पोलिसांनी चारही संशयितांना अटक केली. तर संशयितांची एक महिला साथीदार फरार आहे.

दरम्यान, पुणे-नगर रस्त्यावर मागील सहा महिन्यांपूर्वी मयत मोहन पवार यांच्या अमोल नावाच्या पुतण्याचा अपघात झाला होता. या अपघातात अमोलचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून मोहन पवार व त्यांच्या कुटुंबियांनी अमोलचा खून केल्याचा संशय मोहन पवार यांच्या चुलत भावांना असल्याने यातूनच वरील हत्याकांड घडविल्याची कुणकुण पोलिसांना लागली. व वरील हत्याकांडाचे गुड उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. या ७ जणांच्या हत्ये मागे कुणाचा नेमका काय हेतू…? याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रेस कॉन्फरन्स द्वारे देण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!