मायलेकीच्या भांडणातून घडलं विपरीत, आईकडून मुलीचा गळा दाबून खून, दौंड शहरातील घटनेने उडाली खळबळ..


दौंड : आई आणि मुलीच्या भांडणामध्ये अगोदर तुफान हाणामारी आणि नंतर आई ने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (ता. दौंड) येथील रेल्वे डिफेन्स कॉलनीत बुधवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दिक्षा हीरओम जागिंड (वय. १८ वर्षे,) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सरिता हरिओम जागिंड असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलीचे वडील हरिओम श्यौप्रसाद जागिंड (वय ४४, व्यवसाय नोकरी, रा. डिफेन्स कॉलनी, रेल्वे कॉर्टर, दौंड, मूळ रा. गणपत विहार, तिजारा फाटक, अलवर, राजस्थान) यांनी फिर्याद दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हरिओम जागींड हे पत्नी सरिता हिच्यासह दीक्षा, विजयलक्ष्मी, पायल आणि अनु या चार मुलींसोबत दौंड शहरात राहण्यास असून हरीओम हे रेल्वेमध्ये पॉईंट्स मॅन म्हणून नोकरी करतात. बुधवारी (ता. ६) रोजी संध्याकाळी सरिता व दीक्षा यांच्यामध्ये शाळेतील घटनेवरून वाद झाला.

शाळेत झालेल्या वादावरुन दिक्षा ही आज कोणाशी बोलत नव्हती. दिक्षा ही अचानक सायंकाळी रागाने घराबाहेर निघाली असताना तिला तिची आई सरीता हिने दारातून आत ओढुन घरातील बेडरुममधील बेडवर बसवत दिक्षा हीच्या पोटावर लाथ मारली.

यानंतर दिक्षा हिनेही आईला धक्का दिल्यानंतर तिची आई सरीता हीने चिडून जावुन दिक्षा हिला लाथाबुक्याने मारहाण करु लागली. तेव्हा त्या दोघींची भांडणे सोडविण्यासाठी विजयलक्ष्मी हि दिक्षाची लहान बहीण मध्ये गेली असता तिलाही दोघींच्या भांडणात धक्का लागुन ती बाजुला पडली.

यावेळी तिची आई सरीता हीने दिक्षा हीच्या गळ्यावर लाथ मारून तिला बेडवर आडवे पाडुन दोन्ही हाताने गळा दाबला त्यानंतर मात्र दिक्षा हिने कसलीच हालचाल केली नाही ती बेडवर निपचित पडून राहिली. हि संपूर्ण घटना विजयलक्ष्मी हिने तिचे वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांना सांगितली.

दरम्यान, त्यानंतर फिर्यादी हरिओम यांनी दिक्षा जवळ जावुन तिला आवाज दिला असता ती कसलीही हालचाल करीत नव्हती व तिचे अंग थंड पडले होते त्यावेळेस दिक्षा मयत झाल्याची खात्री त्यांना झाली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. मुलगी दिक्षा हिच्या खून प्रकरणी तिची आई सरिता हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!