तरुणीशी इन्स्ट्राग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पुण्यात एकावर गुन्हा दाखल


पुणे : तरुणीशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील २५ वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.१९) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आदित्य अर्जुन गिते (वय-२५ रा. मु.पो. जामखेड, बैल बाजाराजवळ, ता. जामखेड जि. अहमदनगर) याच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील भाराती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची अर्जुन गिते याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ते एकमेकांशी चॅट करू लागले. त्यानंतर आरोपीने तु मला खूप आवडते माझे तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू असे बोलून तरुणीला प्रपोज केले. त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तिला विवाहाचे अमिष दाखवत आदित्य गिते याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाचा विषय काढल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरु केली.

त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत विवाह करण्यास नकार दिला. तसेच आरोपी आदित्य याने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवले. त्यावरुन त्याने मुलीला व्हिडिओ कॉल करुन अश्लील चाळे करत होता. याबाबत तरुणीने आरोपीला भेटून व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे का करतो अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने चिडून तरुणीला हाताने मारहाण केली आहे.

दरम्यान, बलात्कार प्रकरणी आरोपी आदित्य याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!