पुणेकरांसाठी खुशखबर! हडपसरहून बनारसला थेट रोज ट्रेन; वेळापत्रक व थांबे जाणून घ्या


पुणे : उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वे कडून हडपसर–बनारस–हडपसर ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस सेवा 4 मेपासून सुरू होत आहे.

ही गाडी दररोज सकाळी 7:50 वाजता हडपसरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजता बनारसला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बनारसहून सायंकाळी 6:15 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री 12:10 वाजता हडपसरला येईल.

या एक्स्प्रेसला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, झाशी, प्रयागराज जंक्शन आणि ज्ञानपूर रोड आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

प्रवाशांना या गाडीसाठी आरक्षण IRCTC संकेतस्थळावर तसेच संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर करता येणार आहे. विनाआरक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणाली आणि रेल्वे ॲपद्वारेही तिकीट उपलब्ध होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!