Dahi Handi : पै. राहुल काळभोर मित्र मंडळाची दहीहंडी जय मल्हार दहिहंडी संघाने फोडली! नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या आदांणी प्रेक्षकवर्ग घायाळ !!
Dahi Handi उरूळीकांचन : हवेली तालुक्यातील सर्वात मोठी असलेली लोणी काळभोर येथील महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर मित्र मंडळाची दहीहंडी बारामतीच्या जय मल्हार दहीहंडी संघाने सहा थर रचून फोडली पाच लाख पंचावन्न हजार पाचशे रुपयांचे रोख बक्षीसासह चांदीची गदा पटकवली तर या दहीहंडी साठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमासह चित्रपट अभिनेत्या प्राजक्ता गायकवाड, ऋता दुर्गुळे यांचे खास आकर्षण होते. Dahi Handi
लोणी काळभोर येथील पाषाणकर बाग येथे भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर ,सिताराम लांडगे,युगंधर काळभोर, कमलेश काळभोर,संजय काळभोर,भरत काळभोर,नागेश काळभोर,युवराज काळभोर,अमित काळभोर,अविनाश बडदे यांनी आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अशोक पवार, जेष्ठ नेते माधव काळभोर,प्रताप गायकवाड, सरपंच योगेश काळभोर,ऊपसरपंच ललीता राजाराम काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गौतमी पाटील यांच्या नृत्य अविष्काराने ऊपस्थीतीत गोपाळ भक्त नाचण्यात दंग होते तर कार्यक्रमादरम्यान सिने अभिनेत्री ॠता दुर्गुळे, प्राजक्ता गायकवाड, प्रसिद्ध छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी ऊपस्थीतीतांची मने जिंकली रात्री दहा वाजता बारामतीच्या जय मल्हार दहीहंडी संघाने सहा थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडली या संघास आमदार राहुल कुल, भाजपा नेते प्रदिप कंद,पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, यांच्या ऊपस्थीतीत पारितोषिक देण्यात आले
यावेळी ऊपस्थीतीतांना मार्गदर्शन करताना आमदार राहुल कुल व अशोक पवार यांनी शुभेच्छा दिल्या व ग्रामीण भागात शहरापेक्षा मोठ्या प्रमाणात दहीहंडी ऊत्सव सुरु होत असल्याने तरूणांनी एकजूटीने राष्ट्रहीताचे काम करावे व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांनी अनेक खेळाडूना कुस्ती क्षेत्रात घडविले असल्याने त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले यावेळी तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीसांच्या मोठ्या फौजफाट्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.