Dahi Handi 2023 : उरूळीकांचन मध्ये तळवाडी मंडळाची दहिहंडी सिध्देश्वर पथकाने फोडली! डीजे, लेझर किरणांनी सोहळ्याला उत्सहाला उधान..!


उरुळी कांचन : प्रेक्षकांसाठी पर्वणी असलेल्या उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील आखिल तळवाडी दहीहंडी (Dahi Handi 2023) मंडळाची दहीहंडी सिध्देश्वर दहिहंडी पथक, पिंपळगाव या पथकाने  पाच माळ्यांचा मानवी थर लावून फोडली आहे. डीजेचा थणदणाटात हजारोंची उपस्थितीने सलग २१ व्या वर्षीची ही दहीहंडी नागरीकांना नयनरम्य ठरली आहे.

यंदाच्या वर्षी आखिल तळवाडी मित्र मंडळाने दहीहंडी सोहळ्यात पुतना वध देखावा सादर करून मंडळाने सोहळ्याचे वेगळेपण जपले आहे. या निमित्ताने मंडळाने ५१,१८८ ठेवून दहीहंडी (Dahi Handi 2023)  फोडण्यासाठी आकर्षक इनाम ठेवले होते.

हे इनाम पिपळगाव, श्री सिधेश्वर गोविंदा पथकाने पाच थर लावुन फोडून फटकविले आहे. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, डॉ. मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन , सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवशांत खोसे , किरण धायगुडे , सरपंच भाऊसाहेब कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल तळवाडी दहिहंडी उत्सव मंडळाच्या वतीने संस्थापक सुनिल दत्तात्रय कांचन , मंडळाचे अध्यक्ष अनिल कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी राजीव काळे, भरत काळे, भाऊ कुंजीर, सोमा तावरे, जयेश कांचन, राजू शेख, बंटी कांचन, आदेश कांचन, आशुतोष कांचन, संदीप कांचन , ओंकार रानवडे , सुशांत कुंजीर, सुनिल लिंभोरे आदींनी आयोजनात सहभाग घेतला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!