Dadasaheb Phalke : बॉलीवूड गाजवणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर..


Dadasaheb Phalke :  मुंबई : बॉलिवूड गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांची यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. (Dadasaheb Phalke)

सोशल मीडियावर याविषयी माहिती शेअर करता ठाकूर यांनी असे म्हटले की, वहिदा रेहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके( Dadasaheb Phalke) जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला खूप आनंद होत असून आणि सन्मानाची भावना आहे. त्यांनी वहिदा यांच्या कामगिरीचा गौरव करणारी एक लांबलचक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली आहे.

वहिदा रहमान यांनी ६० – ७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केले. वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतले . ‘सीआयडी’पासून ‘गाईड’पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत.

वहिदा रहमान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगू सिनेमांमधून केली होती. अनेक सिनेमांमध्ये वाहिदा रहमान यांनी आयटम नंबर केलं आहे. एक दिवस असा आला जेव्हा गुरुदत्त यांची नजर वाहिदा रहमान यांच्यावर पडली आणि त्यांचं नशीब चमकलं. हिंदी सिनेविश्वात वाहिदा रहमान यांना आणणारे गुरुदत्त होते.

५ दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या या कारकिर्दीत, त्यांनी आपल्या भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भुमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहिदा यांनी त्यांच्या कामाप्रती समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!