Dad काश वेळ थांबली असती, तर मी… जय पवार यांची डोळे पाणावणारी पोस्ट, अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं…

बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सात दिवस उलटूनही अजितदादा आता आपल्यात नाहीत, या सत्यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये.

अजित पवारांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दरम्यान, त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या आठवणीत एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
जय पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजित पवारांसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये जय यांनी आपल्या मनातील वेदना मोकळ्या केल्या आहेत. पहिला फोटो अजित पवार आणि जय पवार यांचा आहे. ते एका तलावाच्या बाजुला निसर्गरम्य ठिकाणी हाताची घडी घालून उभे आहेत. तर दुसऱ्या फोटोत जयने अजित पवारांना मिठी मारल्याचा फोटो शेअर केला आहेत.

Dad काश वेळ थांबली असती.. मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो, असं लिहित पुढे जय पवार यांनी हार्ट इमोजी शेअरे केला आहे. अवघ्या काही तासातच जय पवार यांचे फॉलोअर्स आणि अजित पवार यांच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्समधून जय पवार यांचं सांत्वन केलं आहे. या शब्दांतून वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि मुलाचे वडिलांप्रति असलेले अतोनात प्रेम दिसून येत आहे.
