वादग्रस्त वक्तव्य प्रकरण! जितेंद्र आव्हाडांची जिभ छाटण्याची हिंदू महासभा नेत्याचं वक्तव्य..!!


जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत असून आव्हाडांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल अशी घोषणा जालन्यातल्या एका नेत्याने जाहीर केले आहे.

जालन्यामध्ये देखील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हिंदू महासंघ आक्रमक झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयुद्ध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल अशी घोषणा हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी केली आहे.

त्याचबरोबर, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बुलढाणा या ठिकाणी देखील भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुलढाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आव्हाडांविरोधात मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. यावेळी जवळपास २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!